प्रगणे डांगरी सहकारी संस्थेवर राष्ट्रवादीच्या लोकमान्य पॅनेलचा दणदणीत विजय. चेअरमनपदी सुधाकर शिसोदे, व्हाईस चेअरमनपदी प्राचार्य भगवान पाटील यांची निवड..

आबिद शेख/ अमळनेर
प्रगणे डांगरी (ता. अमळनेर) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकमान्य पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत लोकमान्य पॅनेलच्या उमेदवारांनी शेतकरी पॅनेलचा दुप्पट-तिप्पट मतांनी पराभव केला. डांगरी, सातरी आणि कलाली या तीन गावांचा या संस्थेत समावेश आहे.
आज, दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी निवड झाली. एकमताने श्री. सुधाकर बाजीराव शिसोदे यांची चेअरमनपदी, तर प्राचार्य भगवान सिताराम पाटील यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणेः
- सर्वसाधारण मतदार संघ: सुधाकर बाजीराव शिसोदे, भगवान सिताराम पाटील, भानुदास उत्तम शिसोदे, रवींद्र नथू पाटील (सातरी), नंदकिशोर सोपान निकम, महारु गजमल बडगुजर, धनराज दामू कोळी, प्रदीप रामराव शिसोदे
- इतर मागासवर्ग: सुनील शिवदास शिसोदे
- महिला राखीव: सौ. संध्या चंद्रकांत शिसोदे, सौ. उज्वला कैलास शिसोदे
- भटक्या विमुक्त: पोपट राघो वाडीले
- अनुसूचित जाती जमाती: प्रताप भगवान शिरसाट
या विजयासाठी अमळनेर शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष आणि माजी सरपंच श्री. अनिल आबा शिसोदे, सातरीचे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. महेंद्र बोरसे, दूध संस्था चेअरमन श्री. महारु बापू पाटील आणि इतर अनेक मान्यवरांनी मोलाचे सहकार्य केले.
अभिनंदनाचा वर्षाव
माजी मंत्री श्री. अनिलदादा पाटील, खासदार सौ. स्मिता ताई पाटील, आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि बाजार समितीचे चेअरमन अशोक पाटील यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले.