गांधलीपुऱ्यात दमबाजी करत भरदिवसा २ हजारांची लूट – रात्रीच आरोपी अटकेत..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील पाचकंदील चौकात शीतल बियर बारजवळ सकाळी ९ वाजता धुळे येथील विनोद ठाकरे यांच्याकडून दमदाटी करून २ हजार रुपये लुटल्याची घटना घडली. आरोपींनी स्वतःला ‘दादा’ म्हणत दहशत निर्माण केली होती.
विनोद ठाकरे हे आपल्या दोन मित्रांसह अमळनेर येथे घर बांधकामासाठी आले होते. गाडीचे पेट्रोल संपल्याने ते चौकात थांबले असताना, तिघा अज्ञातांनी मोटारसायकलची चावी हिसकावून दमदाटी केली. त्यानंतर विनोद यांच्याकडील पैसे जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि “मै यहाँ का दादा हूँ” असे म्हणत घटनास्थळावरून पळून गेले.
विनोद ठाकरे यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. रात्री ९ वाजता गांधलीपुरा येथील मोझम शेख शब्बीर शेख आणि जितू रमेश चव्हाण या दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.