छातीरोगावर मोफत तपासणी आणि उपचार शिबीर – अमळनेरकरांसाठी सुवर्णसंधी रविवार, 6 एप्रिल रोजी डॉ. एजाज एस. रंगरेज यांचे रूबी क्लिनिक येथे आयोजन..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – शहरात प्रथमच छातीच्या आजारांवरील भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र बोरसे (MBBS, MD – सायन हॉस्पिटल, मुंबई) यांच्या उपस्थितीत हे शिबीर रविवार, 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डॉ. एजाज एस. रंगरेज यांच्या रूबी क्लिनिक, दगडी दरवाजाबाहेर, फरशी रोड, अमळनेर येथे पार पडणार आहे.
या शिबिरात दमा, अस्थमा, बालदमा, जुनाट खोकला, वारंवार सर्दी-खोकला, न्युमोनिया, छातीतील दुखणे, टी.बी. नंतरचा दमा, घोरण्याचा त्रास, सिगारेट/तंबाखू व्यसन व झोपेचे विकार असणाऱ्या रुग्णांची सखोल तपासणी केली जाणार आहे.
शिबिरामध्ये पुढील सेवा मोफत मिळणार आहेत:
छातीचा एक्सरे (600/- किंमतीचा) – मोफत
छातीचा सीटी स्कॅन HRCT (3000/- किंमतीचा) – मोफत
फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासणी (PFT – 1000/-) – मोफत
रक्ततपासण्या – मोफत
5 दिवसांची औषधे – मोफत केवळ 100 रुपयांत तपासणीची संधी
या शिबिरात तपासणी शुल्क केवळ 100/- रुपये आहे. शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 9356161953 / 8888055408 या क्रमांकावर संपर्क साधावा.
नागरिकांसाठी आवाहन:
अमळनेर व परिसरातील नागरिकांनी या दुर्लभ संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. योग्य निदान आणि वेळीच उपचार केल्यास अनेक गंभीर आजार टाळता येतात.