अमळनेर मध्ये प्रथमच भव्य छातीरोग शिबीर संपन्न – 150 गरजू रुग्णांना दिला उपचार लाभ..

0


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शहरात प्रथमच छातीच्या आजारांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या भव्य शिबिराचे आयोजन रविवारी, 6 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले. हे शिबीर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत डॉ. एजाज एस. रंगरेज यांच्या रुबी क्लिनिक, दगडी दरवाजाबाहेर, फरशी रोड, अमळनेर येथे पार पडले.

या विशेष शिबिरात मुंबई येथील नामांकित छातीरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र बोरसे (MBBS, MD – सायन हॉस्पिटल) यांनी उपस्थित राहून 150 गरजू रुग्णांची मोफत तपासणी केली आणि आवश्यकतेनुसार उपचार व मार्गदर्शन दिले.

शिबिराचे उद्घाटन डॉ. एजाज रंगरेज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी डॉ. महेंद्र बोरसे यांचे औपचारिक स्वागत केले. पत्रकार आबिद शेख यांचा सत्कार देखील डॉ. बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, शिबिरासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अशरफ मेमन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या शिबिरात डॉ. बहुंगुन्हे, डॉ. रईस बागबान, डॉ. अनिल शिंदे यांनीही सहभाग घेऊन रुग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. तुषार पाटील, रुबी मेडिकलचे संचालक मो. युसुफ रंगरेज व मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमास केशरनंद हॉस्पिटल व रुबी हॉस्पिटल स्टाफ यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन इब्राहिम सर यांनी केले.

शहरात आरोग्य जनजागृती आणि रुग्णसेवा या दृष्टिकोनातून हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले असून, भविष्यात अशा उपक्रमांची आवश्यकता असून ते पुन्हा आयोजित करण्यात यावेत, अशी मागणी उपस्थितांतून करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!