अमळनेर मध्ये भाजपचा ४४ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा; ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव..

अमळनेर (ता. ६ एप्रिल) – भारतीय जनता पक्षाचा ४४ वा स्थापना दिवस अमळनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. मराठा मंगल कार्यालय येथे खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात राज्यस्तरीय आयोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी भाषण लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी पक्षाच्या ४४ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना राष्ट्रहितासाठी निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन केले.
या विशेष दिवशी जनसंघाच्या काळापासून पक्षाशी जोडलेले ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा चौधरी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी भाजपच्या विचारधारेवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांनी एकनिष्ठपणे समाजसेवेचे व्रत घ्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात पक्षासाठी निःस्वार्थ सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सुभाष चौधरी, जिजाब पाटील, सोमा ठाकूर, एन. डी. तात्या, हरचंद लांडगे, गणेश चौधरी, श्यामकांत भावसार, सुभाष पाटील, सुपडू खाटीक, भिका साहेबराव पाटील यांचा यथोचित गौरव करण्यात आला. टाळ्यांच्या गजरात त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी माजी सभापती श्याम अहिरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, खा. शी. संचालक