“अमळनेर तालुक्यात वन्यजीव संकटात : एका दिवसात तीन मृत्यू, एक हरण पिलाचे थरारक बचाव अभियान”

0


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यात ६ एप्रिल रोजी एकाच दिवशी वन्यजीवांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरला. वेगवेगळ्या घटनांमध्ये एक काळवीट आणि दोन हरणांचा मृत्यू झाला, तर एका हरण पिलाला स्थानिक तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवले.

टाकरखेडा-जळगाव मार्गावर शासकीय गोदामाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत सुमारे तीन वर्षांची हरणी जागीच ठार झाली. धक्कादायक बाब म्हणजे अपघातात तिचे पोट फाटल्याने पोटातील पिल्लूही बाहेर पडून मृत्युमुखी पडले.

दोधवद येथे आठ महिन्यांचे काळवीट शेतात मृतावस्थेत आढळून आले. दुसरीकडे जुनोने परिसरात एक तीन महिन्यांचे हरण पिलू विहिरीत पडले होते. मात्र स्थानिक तरुण चेतन समाधान धनगर आणि दुर्वा आनंदा धनगर यांनी धाडस दाखवत विहिरीत उडी घेऊन त्याचे प्राण वाचवले.

या जिवंत हरणावर वनविभागाच्या पथकाने – वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक रामदास वेलसे, सुप्रिया देवरे व इतर कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. तर मृत हरणांचे अंत्यसंस्कार शासकीय नियमानुसार जंगलात करण्यात आले.

कडक उन्हाळा आणि पाण्याच्या टंचाईमुळे हरणे भटकंती करत असावीत, असे वनविभागाचे म्हणणे आहे. जुनोने परिसरात जंगलाला लागलेल्या आगीमुळेही ही जनावरे भयभीत होऊन गावात आले असावीत. गेल्या चार दिवसांत चार हरणांचा मृत्यू, तर तिन्ही हरणांचे विहिरीत पडण्याच्या घटना चिंता वाढवणाऱ्या ठरत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!