रामनगर,भालेरावनगर, आर कें नगर, शहाआलमनगर भागात डासांचा उपद्रव वाढला; आरोग्य धोक्यात, नागरिकांची धुराळणीसाठी मागणी

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील रामनगर, भालेरावनगर, आर. के. नगर आणि शहाआलम नगर या भागांमध्ये डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये उघड्या गटारी व साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या परिसरात साचलेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
संबंधित भागांमध्ये तातडीने धुराळणी व फवारणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.