राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड घोषित.. -कर्णधार पदी भुसावळ चा डेनिस तर उप कर्णधार पदी जळगावचा जकी शेख..

0

24 प्राईम न्यूज 9 April 2025

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थातच महाराष्ट्र फुटबॉल बॉडी च्या माध्यमाने राज्यस्तरीय २० वर्षा आतील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा लोणावळा येथे ११ एप्रिल पासून सुरू होत असून त्यासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर दहा दिवसापासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरू होते त्या शिबिराचा आज अंतिम दिवस व याच दिवशी जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी अंतिम संघ घोषित केला.
यावेळी विफा चे माजी खजिनदार व फुटबॉल संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद आबीद, सचिव फारुख शेख, कार्याध्यक्ष प्रा अनिता कोल्हे, संचालक भास्कर पाटील सह संघटनेचे प्रशासकीय सहकारी राहील अहमद, वसीम शेख, उज्वल काळे ,वसीम रफिक, नितीन डेव्हिड व मेजर चार्लीस, तौसिफ खान व हिमाली बोरोले यांची उपस्थिती होती.

संघाला भास्कर पाटील व अनिता कोल्हे आदींनी शुभेच्छा दिल्या.

निवड झालेले खेळाडू
यश गणेश दोडे, झकी शेख साबीर, अनस शेख शकीलमतीन मोहम्मद पटेल,शेख निहाल अहमद,ब्रिजेश विजय सोनवणे,पुष्कर अनिल चव्हाण,शाह आदिल सईद,(सर्व जळगाव)पार्थप्रदीप महाजन,मोहम्मद अनस जावेद ,डेनिस मोझेस चार्लस,यश संतोष आव्हाड,कार्तिक निशिकांत लोंढे,आणि
शेख मुझ्झन्मिल अहमद,चैतन्य सुरेंद्र सोनने,अब्दुलरहमान ,विजय लक्ष्मण बारेलाप्रणवसुभाष बारेला(सर्व भुसावळ)विजयलक्ष्मण बारेला(रावेर), प्रणव सुभाष बारेला(चोपडा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!