अमळनेर नगरपरिषदेत थंड पिण्याच्या पाणपोईची सुविधा – नागरिकांसाठी दिलासा

आबिद शेख/अमळनेर
कडक उन्हाळ्याच्या झळा वाढत चाललेल्या या दिवसांत अमळनेर नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. नगरपरिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसह शहरातील रहिवाशांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांनी नगरपरिषद कार्यालयात पाणपोई बसवली आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना उन्हात ताजेतवाने पाणी मिळण्याची सुविधा झाली असून, मुख्याधिकारी नेरकर यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेली ही व्यवस्था इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायक ठरत आहे.