नवे क्रांतीपर्व! अमळनेर ते डांगरी पदयात्रा २६ एप्रिल रोजी; स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली..

आबिद शेख/अमळनेर
स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी आणि देशभक्त क्रांतिकारकांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी “नवे क्रांतीपर्व – भारतीय स्वातंत्र्यलढ्याची स्मृती पदयात्रा” आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी अमळनेर येथून डांगरीकडे निघणार आहे.
सौ. गीतांजली संदीप घोरपडे (राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस), डॉ. व्ही. डी. पाटील (तालुकाध्यक्ष, धरणगाव), आणि श्री. बी. के. सूर्यवंशी (तालुकाध्यक्ष, अमळनेर) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा पार पडणार आहे. डांगरी हे गाव स्वातंत्र्यलढ्याचा जिवंत इतिहास आहे. तेथील स्वातंत्र्यसैनिकांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला आणि त्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य लाभले. त्यांच्याच गावातील माती कपाळी लावून आजची तरुणाई प्रेरणा घेणार आहे.
पदयात्रेचे वेळापत्रक:
प्रारंभ: सकाळी ५.१५ वा. लिलाताई स्मारक, ढेकू रोड, अमळनेर
पहिला थांबा: सकाळी ६.३० वा. धार भवानी माता मंदिर परिसर
दुसरा थांबा: सकाळी ८.०० वा. मारवड बस स्टँड परिसर
समारोप: सकाळी १०.०० वा. डांगरी गावात राम मंदिरात प्रदक्षिणा आणि समारोप कार्यक्रम
पदयात्रींसाठी सूचना:
स्वच्छ सैल पांढरे कपडे परिधान करावेत
पाण्याची बाटली व आवश्यक वस्तूंसाठी पिशवी सोबत असावी
२३ एप्रिलपर्यंत नोंदणी अनिवार्य
संपर्क:
सौ. गीतांजली संदीप घोरपडे – 9422279710
डॉ. व्ही. डी. पाटील – 9923223275
श्री. बी. के. सूर्यवंशी – 9422279741
या पदयात्रेत सहभागी होऊन देशभक्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.