सोन्याच्या दरात प्रचंड झपाट्याने वाढ; प्रतितोळा दर ९७,५०० रुपयांवर, लवकरच लाखाच्या उंबरठ्यावर?

24 प्राईम न्यूज 17 April 2025
लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रतितोळा तब्बल ९७,५०० रुपये इतका नोंदवण्यात आला. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात हे दर १ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही प्रचंड वाढ झाली असून, अडीच हजार रुपयांच्या उसळीसह चांदीचा दर ९८,५०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. सोनं-चांदीच्या या वाढत्या दरामुळे ग्राहकांची चिंता वाढली असली, तरीही शुभमुहूर्त आणि सणवार लक्षात घेता मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.