वक्फ बचाव साठी जळगावात महिला सुद्धा मैदानात. -शुक्रवारी धरणे आंदोलन

24 प्राईम न्यूज 20 April 2025
संपूर्ण भारतात वक्फ कायद्यात संशोधन सुरू आस्ताना त्याला विरोध दर्शवण्यात आला होता आता तो कायद्यात रूपांतरित झाल्याने तीव्र स्वरूपात त्याचा विरोध होत आहे. जळगावात सुद्धा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्डाच्या मार्गदर्शन तत्वाप्रमाणे मुफ्ती खालिद,मुफ्ती रमीज , मुफ्ती अबूजर,मौलाना कासिम नदवी, हाफिज रहीम पटेल यांच्या नेतृत्वात व जिल्हा वक्फ बचाव समितीचे फारुक शेख यांच्या समन्वयाने जळगाव वक्फ बचाव समिती कार्यरत असून या समिती च्या माध्यमाने महिला सुद्धा मैदानात उतरल्या आहे.
कॉर्नर मीटिंग व प्रत्यक्ष भेटी द्वारे जनजागरण
वक्फ म्हणजे काय? उम्मीद कायद्यामुळे होणारे नुकसान काय? संविधान विरोधी कसा आहे हा कायदा हे समजावण्यासाठी ते शहरात घरोघरी जाऊन महिलांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
शुक्रवारी धरणे आंदोलनाला बसणार
येणाऱ्या शुक्रवारी शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी संध्याकाळी जळगाव शहर पातळीवर एका धरणे आंदोलनाचे आयोजन केल्याचे महिला विभागा तर्फे आलेमा अशरफुलनीसा, आलेमा नाझिया, आलेमा गुलनाज, निलोफर शेख, डॉ फरहा वकार, शाहिस्ता शकील, व हाजरा शेख यानी कालविले आहे.