एमआयडीसीत ‘चंद्रकोर इंडस्ट्रीज’ प्रेम चौधरी यांच्या नवीन उद्योगाचा शुभारंभ…

आबिद शेख/अमळनेर
धुळे – दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष मा. कैलास भाऊ चौधरी यांचे धाकटे चिरंजीव चि. प्रेम कैलास चौधरी यांनी धुळे एमआयडीसी येथे सुरू केलेल्या चंद्रकोर इंडस्ट्रीज पी.पी. बॅग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या नव्या उद्योगाचा शुभारंभ इर्शाद भाई जहागीरदार यांचे हस्ते नारळ फोडून करण्यात आला.
या प्रसंगी प्रेम चौधरी यांना नवीन उद्योगात यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमावेळी इर्शाद भाई जहागिरदार, कैलास भाऊ चौधरी, महेंद्र दादा शिरसाठ, आनंद सैंदाने, ज्ञानेश्वर माळी, संतोष केदार, राज चौधरी, अभिजित देवरे, शोएब सय्यद, मनीष चौधरी, ऋषिकेश साळुंखे आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते.