अर्बन बँकेसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सट्टा जुगारावर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हे दाखल..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील अर्बन बँकेसमोरील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या सट्टा जुगारावर स्थानिक पोलिसांनी धाड टाकून तिघांना अटक केली आहे. ही कारवाई १९ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे आणि हर्षल पाटील यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही धाड टाकली. धाडीत जिजाबराव भिका पाटील (रा. तांबेपुरा), विकी सुंदरदास बठेजा (रा. सिंधी कॉलनी) आणि संतोष मधुकर बनसोडे (रा. गांधलीपुरा) या तिघांना सट्टा जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले.
तपासादरम्यान त्यांच्या जवळून सट्टा जुगारासाठी वापरली जाणारी साधने आणि रोख रक्कम १२६० रुपये जप्त करण्यात आले. संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अशा प्रकारचे जुगार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित दुकाने जप्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.