ढेकू खु. येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे मका जळून खाक; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर तालुक्यातील ढेकु खुर्द येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नथू गुणवंतराव पाटील यांच्या 64 हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाला आग लागून जवळपास 1,35,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
तर, सुधाकर नाटू पाटील यांच्या 99 हेक्टरवरील मका जळून 2,30,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार समोर आले आहे. ही आग विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे अमळनेर येथील अग्निशमन दल वेळेवर उपलब्ध न झाल्याने गातील लोकांनी ट्यांकर ने आग आटोक्यात आणली
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तातडीने मदतीची मागणी केली आहे.