श्री वर्णेश्वर महादेव मंदिर परिसराच्या २.४० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन..

0


अमळनेर /आबिद शेख. – अमळनेर येथील पुरातन श्री वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थान परिसराचा कायापालट करणाऱ्या २.४० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ या होत्या.

या विकासकामांत चोपडा रोड ते श्री वर्णेश्वर महादेव मंदिर रस्त्याचे मजबुतीकरण, भक्तनिवास असलेल्या समाज भवनाचे भूमिपूजन, मंदिर परिसरातील तलावाचे सुशोभीकरण, तसेच वॉल कंपाऊंडची उभारणी यांचा समावेश आहे. नारळ फोडून व कुदळ मारून या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, “या विकासकामांमुळे अमळनेरचा सर्वांगीण विकास साधला जाईल.” तर खासदार स्मिता वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “हे मंदिर पुरातन असून येथील नव्या विकासकामांमुळे धार्मिक पर्यटनास चालना मिळेल.”

या कार्यक्रमात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत व सत्कार केला. मंचावर ट्रस्टी संजय पाटील, संजय शुक्ल, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, ॲड. व्ही.आर. पाटील, भिकन वाडीले, कृ.उ.बा. संचालक हिरालाल पाटील, हेमंत पवार, भाजप शहराध्यक्ष विजय राजपूत, सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, मराठा समाज कार्यालयाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, खा.शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच, हेमंत भांडारकर, राजू फाफोरेकर, देविदास देसले, सुनिल पाटील, ॲड. तिलोत्तमा पाटील, महेश कोठवदे, डॉ. संजय शहा, गणेश पाटील, राजेंद्रभोला टेलर, भरत परदेशी, विजय पवार, रामराव पवार, सुरेश पाटील, सौ. पायल पाटील, अनिल कासार आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामराव पवार, नारायण बडगुजर, राजू देसले, भावेश चौधरी, सतीश धनगर आदींसह श्री वर्णेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आत्माराम चौधरी यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!