अमळनेरमध्ये जलतरण तलावाचा अभाव; खेळाडूंमध्ये नाराजी, लोकप्रतिनिधीं कडून दुर्लक्ष..

आबिद शेख/अमळनेर
जलतरण हा केवळ एक खेळ नसून शारीरिक आरोग्यासाठीही एक अत्यंत उपयुक्त व्यायामप्रकार मानला जातो. अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये जलतरण तलावांची उपलब्धता आहे, मात्र अमळनेर सारख्या शहरात या मूलभूत सुविधेचा अभाव जाणवतो.
स्थानिक जलतरण खेळाडू आणि क्रीडाप्रेमी नागरिकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, “आमच्याकडे जलतरणासाठी आवश्यक सुविधा नाहीत, त्यामुळे आम्ही कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. आमचं कौशल्य आणि मेहनत वाया जाते.”
शहरात एक अद्ययावत जलतरण तलाव व्हावा, अशी खेळाडू आणि पालकवर्गाकडून 24 प्राईम न्यूज कळे खंत व्यक्त केली आहे“लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे लक्ष देतील का?”
या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक आणि युवा खेळाडूंनी एकत्र येऊन जलतरण तलावाच्या मागणीसाठी आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर योग्य पावले उचलावीत, अशी सर्वांची अपेक्षा आहे.