भाजप अमळनेर विधानसभा – चार मंडळ अध्यक्षांची निवड जाहीर…

अमळनेर /आबिद शेख
भारतीय जनता पार्टीच्या अमळनेर विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक फेरबदलांतर्गत चार मंडळ अध्यक्षांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. विविध मंडळांमध्ये पार पडलेल्या या निवडींच्या प्रक्रियेत निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभावी भूमिका बजावली.
निवड झालेल्या मंडळ अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे –
- जानवे मंडळ अध्यक्ष – श्री. जिजाबराव आसाराम पाटील
- पातोंडा मंडळ अध्यक्ष – श्री. राहुल किशोर पाटील
- अमळनेर शहर अध्यक्ष – श्री. योगेश गोविंदा महाजन
- बहादरपूर मंडळ अध्यक्ष – श्री. समाधान पाटील
या निवडींच्या प्रक्रियेत खालील निवडणूक अधिकारी कार्यरत होते –
अमळनेर शहर: कृतिकाताई आफ्रे, निलेश भाऊ परदेशी
जानवे मंडळ: सुरेंद्रभाऊ बोहरा
पातोंडा मंडळ: एस. आर. पाटील, भिका भाऊ कोळी
बहादरपूर मंडळ: संजय भाऊ महाजन
या निवडीनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, उद्योग मंत्री संजय सावकारे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजू भोळे, निवडणूक प्रमुख नंदू महाजन, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांचा समावेश आहे.