सोनज गावाचा अभिमान. – कु. समरीन आदिल पिंजारी यांची महसूल सहायक पदावर नेमणूक!

24 प्राईम न्यूज 22 April 2025.
सोनज पावन भूमीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोनज गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व श्री. आदिल मेहबूब पिंजारी यांची कन्या कु. समरीन आदिल पिंजारी हिने नुकत्याच पार पडलेल्या एमपीएससी अंतर्गत स्पर्धा परीक्षेत यश मिळवत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक पदावर नियुक्ती मिळवली आहे.
कु. समरिन हिने केलेली ही उल्लेखनीय कामगिरी संपूर्ण सोनज गावासाठी गौरवाची बाब आहे. तिच्या या यशामागे तिची मेहनत, चिकाटी आणि पालकांचा खंबीर पाठिंबा आहे.
गावातील सर्व नागरिकांच्या वतीने कु. समरीन यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, भावी वाटचालीसाठी संपूर्ण सोनजकरांच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा!देण्यात आल्या.