जिजाऊ रथयात्रेचे अमळनेरात विविध समाजातर्फे जोरदार स्वागत.                                            फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी रथयात्रा- सौरभ खेडकर..

0

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : फुले ,शाहू ,आंबेडकरांचा पुन्हा जागर करून महाराष्ट्राची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकाला शांतता आणि समन्वयाचे जीवन जगणे आवडते म्हणून सामाजिक शांतता निर्माण होण्यासाठी राज्यभर जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्य संयोजक सौरभ खेडकर यांनी अमळनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात बोलताना केले.
मराठा सेवा संघातर्फे आयोजित वेरूळ ते पुणे जिजाऊ पदयात्रेचे २२ रोजी अमळनेरात आगमन झाल्यानन्तर धनगर समाजाचे अध्यक्ष मच्छीन्द्र लांडगे, मुस्लिम समाजाचे रियाज मौलाना, खाटीक समाजाचे हमीद गुरुजी , मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील ,मराठा सेवा संघातर्फे अशोक पाटील , जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली शेवाळे , मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा शीला पाटील , आदिवासी ठाकूर समाजातर्फे दिलीप ठाकूर , खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक , अर्बन बँकेचे संचालक प्रदीप अग्रवाल , माळी समाजातर्फे लक्ष्मण महाजन , योगराज संदानशीव , पारधी समाज अध्यक्ष संजू पवार , जैन समाजातर्फे घेवरचंद कोठारी , नाभिक समाजातर्फे कैलास सैनदाने, दीपक खोंडे , भोई समाजातर्फे संजय भोई , कुणबी समाज अध्यक्ष शेखर पाटील या विविध समाजातर्फे स्वागत करण्यात आले. पैलाड येथून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या मोटरसायकल रॅली ने रथ यात्रा सन्मानाने शहरात आणण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर , सुभाषचंद्र बोस ,सानेगुरुजी , छत्रपती शिवाजी महाराज , महाराणा प्रताप ,बळीराजा यांच्या पुतळ्यांची पूजा करून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर धुळे रोडवरील जिजाऊ प्रवेशद्वाराजवळ रथ यात्रेचा समारोप झाला. तेथून रथ यात्रा मराठा समाज मंगल कार्यालयात आल्यानन्तर सभेत रूपांतर झाले. यावेळी प्रा अर्जुन तनपुरे म्हणाले की महाराष्ट्रातील १८ पगड जातींना एकत्र करून महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही जातीविरहित रथयात्रा आहे. राज्यात अस्थिरता आली आहे, जातिजातीत भेद केले जात आहेत हे डाव उधळून लावण्यासाठी सर्व समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी ही रथयात्रा आहे.
व्यासपीठावर मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष जयवंतराव पाटील , चाळीसगावचे सुधीर पाटील , सुरेश पाटील , डॉ गजानन पारधी हजर होते.
सुरुवातीला वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. सूत्रसंचालन प्रा डॉ लीलाधर पाटील यांनी तर आभार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी मानले. यासाठी तिलोत्तमा पाटील , सीमा पाटील ,स्वप्ना पाटील ,शीतल सावंत , पद्मजा पाटील ,आरती पाटील , अनिता संदानशिव , नूतन पाटील ,पूनम ठाकरे ,सुरेखा खैरनार , विक्रांत पाटील , श्याम पाटील ,प्रा अशोक पवार , रामेश्वर भदाणे , मनोहर निकम , वाल्मिक मराठे ,दीपक पाटील , प्रा डॉ विलास पाटील ,कैलास पाटील , एस एम पाटील , निंबाजी पाटील , प्रेमराज पवार ,चंद्रकांत देसले यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!