धुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व श्रद्धांजली कार्यक्रम..

24 प्राईम न्यूज 24 April 2025
धुळे, 23 एप्रिल 2025 – जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला असून, या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, महिला शहराध्यक्ष जया ताई साळुंखे, कार्याध्यक्ष रविंद्र आप्पा आघाव, माजी नगरसेवक कांतिलाल आबा दाळवाले, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस महेंद्र दादा शिरसाठ, युवक शहराध्यक्ष तेजस रणसिंग, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष आनंद सैंदाने, ओबीसी सेल शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, सेवादल शहराध्यक्ष निलेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय वसीम भाई पिंजारी, संतोष केदार, संजय अहिरे, स्वप्नील पोळ, रोहन पोळ, शोएब सय्यद, विशाल वानखेडे यांच्यासह रंजना निकुंभे, संगीता बोरसे, चंद्रकला खैरनार आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षाच्या वतीने या अमानुष हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली.