जम्मू काश्मीर पहलगाम भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व कारवाईची मागणी. -मुस्लिम एकता संघटनेची मागणी..

24 प्राईम न्यूज 24 April 2025
जम्मू काश्मीर च्या पहलगामच्या खोऱ्यातील रिसॉर्ट मध्ये ४० पर्यटकांच्या गटावर दिनांक २२ एप्रिल रोजी दोन/ तीन अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी झाले त्या घटनेचा जळगाव जिल्हा एकता संघटना तर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना ईश्वर चीर शांती देवो व जखमी रुग्णांना लवकरात लवकर बरे करो तसेच
मृत परिवारांच्या दुखात सुद्धा आणि सहभागी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हा भ्याड हल्ला करणारी दहशतवादी संघटना टी आर एफ चा सुद्धा तीव्र शब्दात निषेध करून त्याच्यावर अत्यंत कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
माननीय अप्पर जिल्हाधिकारी अंकुश किनोटे यांच्या हस्ते सदरचे निवेदन महामय राष्ट्रपती यांना सादर करण्यात आले.
एकता संघटनेचे शिष्टमंडळात यांचा होता समावेश
फारुक शेख,सय्यद चांद, भुसावळ चे साबीर शेख, शेंदुर्णीचे अशपाक भागवत व रेहान शेख, मझर पठाण, मतीन पटेल,अनिस शहा
अन्वर सिकलगर , आरिफ देशमुख, बाबा देशमुख,युसुफ पठाण, सलीम इनामदार,अमजद पठाण,कासिम उमर, मुजाहिद खान, सईद शेख, इम्रान शेख,
नजमुद्दीन शेख,आरिफ अजमल , आदींचा समावेश होता.