अमळनेर येथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन.. – गणपती हॉस्पिटल आणि राय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर (प्रतिनिधी) – राय फाऊंडेशन, अमळनेर यांच्या सौजन्याने गणपती हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्रतापनगर मिल चाल, अमळनेर येथे करण्यात आले.
या शिबिरात हृदयरोग तपासणी, क्षयरोग (टी.बी), दमा, ईसीजी, रक्तातील साखर तपासणी, HbA1c, न्यूरोपथी व इतर विविध आजारांबाबत तपासण्या करण्यात आल्या. शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. पंकज संतोष महाजन (MBBS, MD मेडिसिन), डॉ. मयुर संतोष महाजन (MBBS, MD भुलतज्ञ) यांचे विशेष योगदान लाभले. यासोबतच गणपती हॉस्पिटलचा कर्मचारी वर्गही सक्रिय होता.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये धी. प्रताप कुमार व्यायाम शाळा, अमळनेर, नगरसेवक मनोज भाऊराव पाटील, तुषार देवदत्त संदानशिव (अध्यक्ष, राय फाऊंडेशन), देवदत्त हरचंद संदानशिव (सचिव, राय फाऊंडेशन), नगरसेवक नानाभाऊ ठाकुर, शोकत दादा अली सैय्यद, इक्बाल पठाण, शेखर भाऊ कुंभार, लियाखत अली सैय्यद, किशोर ठाकुर, जय पाटील, सुरज शुक्ला, पिंटू कुंभार, असिफ शेख, हृदयनाथ मोरे, इस्माईल जहागीरदार, चंदू खाटीक, सागर पठाण यांनी परिश्रम घेतले.