काश्मिरमधील भीषण अतिरेकी हल्ल्यावर जमीअत उलमा धुळेचा तीव्र निषेध सरकारकडे कठोर कारवाईची व नुकसान भरपाईची मागणी..

24 प्राईम न्यूज 25 April 2025
धुळे – काश्मिरातील पहलगाममधील बैसरन घाटी परिसरात 22 एप्रिल रोजी झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्याचा जमीअत उलमा (अर्शद मदनी) धुळे शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या अमानुष हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून 24 जण गंभीर जखमी झाले.
जमीअत उलमा धुळेच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत भारत सरकारकडे मागणी केली की, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या दि रेझिस्टन्स फ्रंट या पाकिस्तानपुरस्कृत संघटनेचा बंदोबस्त करावा आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची नुकसानभरपाई आणि जखमींना 5 लाख रुपये व सरकारी नोकरी दिली जावी.
या निवेदनावर जमीअत उलमा धुळेचे जिल्हाध्यक्ष हाफिज हिफजुर रहेमान, शहराध्यक्ष मौलाना जियाउर रहेमान, सचिव मौलाना शकील कासमी, तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.