पवित्र पोर्टल उर्दू शिक्षक भरती टप्पा दोन रिक्त पदे भरण्यासाठी एकता संघटनेचे जिल्हा परिषदेला साकडे..

24 प्राईम न्यूज 26 April 2025
महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केल्याने पहिला शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण झाला दुसरा टप्पा मध्ये जळगाव जिल्ह्यातील उर्दू माध्यमाची सुमारे ५० पदे रिक्त असल्याने ती पवित्र पोर्टल ला अपलोड न केल्याने जळगाव जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचे अतोनात न भरून निघणारे नुकसान झाल्याने त्या जागा त्वरित पवित्र पोर्टल ला उपलब्ध करून देण्याविषयी आज जिल्हा परिषद प्रशासक कीय कार्यालय व शिक्षण विभागात एकता संघटनेने साकडे घातले असता शुक्रवार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व उप शिक्षणाधिकारी हे उपलब्ध नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वी सहाय्यक राजू सोनवणे तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक श्री अमोल चव्हाण व मिलिंद सुपे यांना तक्रार अर्ज देण्यात आले.
तीन दिवसात कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार – फारूक शेख
शिक्षक भरती टप्पा दोन बाबत आवश्यक ती कारवाई २८ एप्रिल पर्यंत न केल्यास २९ एप्रिल पासून जिल्हा परिषद येथे ठिय्या आंदोलन, बेमुदत उपोषण, अथवा इतर लोकशाहीने दिलेल्या हक्का नुसार तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी लेखी तक्रार एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेली आहे.
साकडे घालण्यासाठी यांची होती उपस्थिती
मुफ्ती खालीद, फारुख शेख, नदीम मलिक, हाफिज रहीम पटेल, मौलाना उमर शेख , अनवर खान सिकलगर , अनिस शाह, रऊफ टेलर, कासिम उमर, नजमुद्दीन शेख, इरफान शेख (पाचोरा), मझर पठाण, मुजाहिद शिकलगर, मोहसीन युसुफ, इमरान गनी, इरफान अली सय्यद, सलीम इनामदार, शेख इम्तियाज( भुसावळ), मोहम्मद साजिद, शेख व युसुफ खान तसेच ज्या भावी शिक्षकांसोबत अन्याय झाला त्यात शिफा शेख (जामनेर), नसीम खान , जळगाव, रहीम खान जामनेर, अलीम खाटीक पारोळा आदींची उपस्थिती होती.