राज्यात अव्वल कामगिरी करणाऱ्या अमळनेर अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान! 🔷 ९३% पाणीपट्टी वसुली – मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना मानाचा मुजरा!

0

आबिद शेख/अमळनेर



अमळनेर : महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९३ टक्के पाणीपट्टी वसूल करणाऱ्या अमळनेर नगरपरिषदेच्या टीमचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह उपमुख्याधिकारी, अभियंते व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

नगरविकास विभागात सर्वोच्च कामगिरी बजावल्यामुळे या सन्मानाचे औचित्य साधण्यात आले.
पालिकेच्या ४.५८ कोटींच्या उद्दिष्टापैकी ४.२३ कोटी पाणीपट्टीची वसुली करण्यात आली. विकासकामांमध्येही जलद आणि दर्जेदार अंमलबजावणी झाली.

यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनाही गौरविण्यात आले.
गौरव सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!