पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा “कौमी एकता फाऊंडेशन” कडून तीव्र निषेध…

0



24 प्राईम न्यूज 26 April 2025

फैजपूर (ता. रावेर) – जम्मू आणि काश्मीरमधील निसर्गरम्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या अमानवीय हल्ल्याचा कौमी एकता फाऊंडेशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.

या भ्याड हल्ल्यात आतापर्यंत २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कौमी एकता फाऊंडेशनने या हल्ल्याचा जाहीर निषेध करताना म्हटले आहे की, “दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. भारताच्या मातीत दहशतवादाला स्थान नाही. शांतता, समता आणि एकतेचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सोबत आम्ही आहोत.”

फाऊंडेशनने तपास यंत्रणांना आवाहन केले आहे की, हल्लेखोर दहशतवाद्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, तरच पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. तसेच, देशातील नागरिकांनी आपसात एकजूट राखावी आणि शांतता-सामंजस्याचे वातावरण कायम ठेवावे, असेही फाऊंडेशनने म्हटले आहे.

या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान, सय्यद असगर, सेक्रेटरी सय्यद जावेद, कलीम खान, फिरोज खान, अजमल खा, सांब आबिद शेख, अमजद खान, शेख शरीफ, हुसेन खान, अस्लम खान, जफर खान, शेख आरिफ, शेख फारुक, शेख साजिद, अमजद खान, जफर अली, अजहर खान, शेख वाहेद, शेख वजीर, तौफिक खान, शाकीर खान, गुड्डू मेंबर, शेख दानिश, शेख काशिफ आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!