दिव्यांग बांधवांसाठी सुवर्णसंधी : अमळनेर मध्ये मोफत कृत्रिम हात-पाय रोपण शिबिर..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर -दिव्यांगत्वावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात करून जीवन उन्नत करण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सक्षम देवगिरी प्रांत यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स बसविणे तसेच मोजमाप व तात्काळ वितरण यासाठी मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत, रोटरी हॉल, पी बी ए इंग्लिश मिडीयम स्कूल, बस स्टँड समोर, अमळनेर येथे पार पडणार आहे.
ज्यांना कृत्रिम हात, पाय किंवा कॅलिपर्सची आवश्यकता आहे त्यांनी आपल्या हात-पायांचे मोजमाप या शिबिरात करून घ्यावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे:
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) स्वतःचा फोटो
४) वैद्यकीय प्रमाणपत्र (UDID कार्ड)
अधिक माहितीसाठी संपर्क:
आनंद माळी – 93715 91600
सुरेंद्र साळुंखे – 73502 46288
हितेश शहा – 88060 79971
स्वर्णदिप राजपुत – 88889 17651
हेमंत सैंदाणे – 90212 47249
संकल्प वैद्य – 73878 06474