पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांना श्रद्धांजली व आतंकवादाचा निषेध : अमळनेर मध्ये कॅण्डल मार्चचे आयोजन..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर — जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील तमाम देशभक्त नागरिकांनी कॅण्डल मार्चचे आयोजन केले आहे. या दुर्दैवी घटनेत शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व दहशतवादाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी हा कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून कॅण्डल मार्चला सुरुवात होणार असून, परमपूज्य साने गुरुजींच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे.
या कॅण्डल मार्चसाठी सर्व धर्मीय अमळनेरकर नागरिक बंधू-भगिनींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दहशतवादाचा निषेध करण्यासोबतच शांततेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
निमंत्रक : सर्व धर्मीय अमळनेरकर नागरिक