दयाराम लोंढे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश..

24 प्राईम न्यूज 27 April 2025
आज रविवार, दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते मा. इर्शाद भाई जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांच्या आदेशाने तसेच धुळे शहराध्यक्ष मा. कैलास भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात, प्रदेश सरचिटणीस महेंद्र दादा शिरसाठ व सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष आयु. आनंद अण्णा सैंदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, श्री. दयाराम ओंकार लोंढे (निवृत्त भांडार अधीक्षक, लेखा शिक्षण विभाग) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
श्री. लोंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून पक्ष प्रवेश केला आहे.
या प्रसंगी पक्षाचे नेते मा. इर्शाद भाई जहागिरदार, शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र दादा शिरसाठ, कार्याध्यक्ष रविंद्र आप्पा आघाव, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष आनंद अण्णा सैंदाणे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ माळी, रईस काझी, संतोष भाऊ केदार, राहुल पोळ व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.