अंदरपुरा मोहल्ला येथे बालरोग तपासणी व मोफत औषधे वाटप शिबिर उत्साहात संपन्न

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – येथील आधार बहुउद्देशीय संस्था संचलित व विप्रो केअर्सच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या आधार शहरी आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून अंदरपुरा मोहल्ला येथे मोफत बालरोग तपासणी व औषधे वाटप शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले.
या शिबिरात शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सचिन काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ५२ बालकांची तपासणी करण्यात आली व आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिराचे यशस्वी आयोजन डॉ. सचिन काटे सर, योगिता पाटील व रईसा बी महंमद अली सैय्यद यांच्या परिश्रमामुळे शक्य झाले.
शिबिरात बालकांच्या आरोग्य विषयक विविध समस्या तपासण्यात आल्या तसेच योग्य मार्गदर्शन व उपचार दिले गेले.
यावेळी नागरिकांनीही शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.