वक्फ कायदा रद्द करा : मुस्लिम महिलांचे धरणे आंदोलन..

24 प्राईम न्यूज 29 April 2025

वक्फ कायदा १९९५ मध्ये अलीकडेच मंजूर झालेल्या सुधारणा या भेदभाव पूर्ण आणि भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत, तसेच हा कायदा भेदभाव पूर्ण आहे. कारण ते वक्फ मालमत्तेला दिलेले संरक्षण आणि सुरक्षा काढून घेते तर हिंदू ,शीख ,बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायांना उपलब्ध करून देते. एवढेच नव्हे तर धर्माचे स्वतंत्रपणे पालन करणाऱ्या अधिकाराचा आणि स्वतःच्या धार्मिक संस्था स्थापन करण्याचा आणि व्यवस्थापित करण्याचा अधिकाराचा विरुद्ध आहे.
मुस्लिम नागरिक किमान पाच वर्षापासून धर्माचे पालन करणारा असावा तोच मालमत्ता वक्फ म्हणून दान करू शकेल हे सरळपणे स्वातंत्र्याचे उल्लंघन करतो. या नवीन कायद्यामुळे धार्मिक संस्थांना दिलेल्या अधिकार आणि संरक्षण हिरावून घेतले आहे. हा कायदा भेदभाव करणारा असून मर्यादांच्या कायद्यातून सूट काढून घेतलेला आहे. तसेच वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन आणि प्रशासन करण्याचा मुस्लिमांचा अधिकार हिरावून घेत आहे.
अत्यंत गंभीर बाब म्हणजे जे कोणी वक्फ जमिनीवर अतिक्रण केले असेल ते आता मालक होऊ शकतात तसेच वक्फ बोर्ड आणि केंद्रीय व परिषदेचे सदस्य हे फक्त मुस्लिम होऊ शकतात ही अट सुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे.
वक्फ बाय युजर ची नोंदणी असणे आवश्यक आहे. अन्यथा ती सरकार दरबारी जप्त केली जाईल.
हे बदल मुस्लिमांना त्यांच्या स्वतःच्या संस्था स्थापन करण्यापासून, चालवण्यापासून आणि व्यवस्थापित करण्यापासून वंचित ठेवत असल्याने आमचा त्यास विरोध आहे अशा आशयाचे मागण्याचे निवेदन मुस्लिम महिलांनी महामहीम राष्ट्रपतींना सादर केलेले आहे.
जळगावत प्रथमतः मुस्लिम महिलांचे मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्डाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात आंदोलन सुरू असून जळगावात सुद्धा वक्फ बचाव समिती अध्यक्ष मुफ्ती खालिद, मुफ्ती रमीज , मौलाना तौफिक शहा, मुफ्ती अबूजर, मौलाना वसीम पटेल, हाफिज रहीम पटेल, सामाजिक संघटना चे पदाधिकारी व समन्वयक फारुक शेख यांच्या नेतृत्वात गठित झाली असून त्या माध्यमाने विविध प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महिलांनी घोषणा व भाषण द्वारे केला निषेध
महिलांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कायदा कसा असंविधानिक व अहितकारी हितकारी आहे हे पटवून दिले.
यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या तसेच अभ्यासपूर्व भाषणे सुद्धा झाली.
यांची झाली भाषणे व गीत
आलेमा नाझिया, आलेमा अश्रुफुनीसा , शाहिस्ता शकील, अम्मारा तस्मिम , डॉक्टर फराह, मुजना खान, उम्मे कुलसुम ग्रुप, शिरीन अँड ग्रुप, अलीना अँड ग्रुप,
नारे देणारी महिला
फर्जना अनिस शाह, सालेहा अय्युब, रोजीना खाटीक व डॉक्टर फराह
जिल्हाधिकारी मार्फत महामय राष्ट्रपतींना निवेदन
धरणे आंदोलनाचे निवेदन
निलोफर इक्बाल ,डॉक्टर फरहा, शबाना देशमुख, हाजरा फारुख, आलेमा गुलनाझ, आलेमा आश्रफुनिसा, आलेमा अथरुनिसा, आलेमा नाझीया, अल्मास आसिफ खान, आलेमा शाहिस्त शकील , अम्मारा तसनीम , अफीफा मॅडम , शेहवार मेमन, सोमय्या नदीम या महिलांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हा दंड गजेंद्र पाटोळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आंदोलन यशस्वीतेसाठी प्रयत्नशील महिला
हाजरा फारुख, शकीला हमीद, आयशा हमीद, फर्जंना अनिस, बुशरा नईम, कौसर बाजी, कानेता वसी, फरजाना बाजी, अकीला बाजी, सलीमा बाजी, आलेमा नुसरत, खुर्शीद रफिक फर्जाना कैसर , शबाना देशमुख, अफीफा मॅडम, अर्शिन शेख, समीना शेख, सिरत आदिल, नाजमा जहीर, शहबाज, अस्मा खाटीक , सुमैया नदीम,तसेच वैद्यकीय टीम मध्ये डॉक्टर रोशन, डॉक्टर लुईजा, डॉक्टर फराह व डॉक्टर हुमेरा तय्यब व अर्शी इकबाल, कशक झाकीर, अल्मास आसिफ, सुमैया नदीम इत्यादींनी प्रयत्न केले.
धरणे आंदोलन यशस्वीतेसाठी वक्फ बचाव समिती महिला गट तर्फे वरिअर वुमन बचाव समिती तयार करण्यात आली असून त्यात प्रामुख्याने सुमारे २२५ महिलांचा समावेश होता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने हे धरणे आंदोलन यशस्वी केले.
धरणे आंदोलनाची सुरुवात श्रीमती आलेमा बुशरा नईम यांच्या कुराण पठणाने झाली व नाते पाक मेहविष साजिद खान यांनी सादर केले तर धरणे आंदोलनाची सांगता मुफ्ती खालिद यांच्या दुवाने झाली.
धरणे आंदोलनाचे प्रास्ताविक श्रीमती निलोफर इक्बाल यांनी सादर केले तर आभार श्रीमती हाजरा शेख यांनी मानले.
आंदोलनाचे सूत्रसंचालन श्रीमती उम्मे हानी यांनी केले