धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगल कलश यात्रेचे भव्य आयोजन..

24 प्राईम न्यूज 29 April 2025
धुळे — ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित मंगल कलश यात्रेचे आज धुळे शहरात भव्य स्वागत करण्यात आले. या यात्रेचे आगमन माजी मंत्री तथा आमदार मा. अनिल भाईदास पाटील, समन्वयक तथा प्रदेश सरचिटणीस मा. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रशांती कदम, जळगाव जिल्हाध्यक्ष मा. संजय पवार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा. अभिजीत मोरे, उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्षा अभिलाषा ताई रोकडे, प्रसाद सोनवणे व भूपेश भाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यात्रेचे धुळे शहरातील स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. इर्शाद भाई जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष मा. कैलास भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात नेहरू चौक, देवपूर येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
धुळे शहराच्या ओळखीच्या प्रतीकस्थळांपैकी पांझरा नदीचे पाणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली संदेश भूमीतील माती आणि दाता सरकार दर्ग्यावरील गुलाब पुष्पांनी भरलेला पवित्र कलश धुळे शहराच्या वतीने यात्रेत सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी, महिला शहराध्यक्ष जया ताई साळुंखे, कार्याध्यक्ष रविंद्र आप्पा आघाव, जावेद दादा बिल्डर, महेंद्र दादा शिरसाठ, आनंद भाऊ सैंदाने, ज्ञानेश्वर भाऊ माळी, तेजस रणसिंग, रईस काझी, प्रकाश भाऊ चौधरी, राज चौधरी, जयेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांमध्ये रंजना निकुंभे, योजना हिरे, संगीता बोरसे आदींचा सक्रीय सहभाग राहिला.