पहेलगाम (काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध; धरणगाव मुस्लिम समाजाने केली कडक कारवाईची मागणी.

24 प्राईम न्यूज 1 May 2025
काश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू बांधवांचा मृत्यू झाला. या अमानुष कृत्याचा धरणगाव येथील मुस्लिम समाजाने तीव्र निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
धरणगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी इरफान हाजी अरमान शेख यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा दहशतवाद्यांना शोधून त्यांना ठार करण्यात यावे. त्यामागे जे कोणी शक्ती काम करत असतील त्यांनाही धडा शिकवावा.
या निवेदनावर समाजातील अनेक जबाबदार नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. यामध्ये उपाध्यक्ष हाजी रफीक कुरेशी, माजी नगरसेवक अहमद पठान, सगीर अहमद गुलाम रसूल खाटीक, करीम खान, तौसीफ पटेल, नगर मोमिन, नदीम काझी, वसीम कुरेशी, जमशेर खान बेलदार, शोएब बागवान, शेख निजामोद्दीन बेलदार, वसीम पिंजारी आणि मुठलिब मोमिन यांचा समावेश आहे.
धरणगावमधील मुस्लिम समाजाच्या या भूमिकेचे अनेक स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.