साने गुरुजी फाउंडेशन संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्कार पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान,

24 प्राईम न्यूज 3 May 2025
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक मे 2025 या महाराष्ट्र दिवस व जागतिक कामगार दिवस निमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जळगाव, यांच्या वतीने साने गुरुजी फाउंडेशन, अमळनेर, जिल्हा .जळगाव, या संस्थेला जलसंधारण, पर्यावरण, कृषी ,शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास,युवक या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री माननीय नामदार श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा युवा संस्था पुरस्कार देण्यात आला, यात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी स्वीकारले,यावेळी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद IAS ,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी IPS,जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल IAS ,जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्र नाईक, क्रीडा अधिकारी सुरेश सर उपस्थित होते, यावेळी संस्थेचे संदीप धाकड, सचिन मोरे, कल्पना वाणी, उषा कोळी, सुनीता पाटील ,वंदना पवार ,कार्यकर्ते उपस्थित होते, संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे,