कामगार दिनानिमित्त आर. के. पटेल कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर दिनांक २ मे २०२५ रोजी कामगार दिनानिमित्त राय फाऊंडेशन, अमळनेर यांच्या मार्फत गणपती हॉस्पिटल आणि क्रिटीकेयर डॉ. पंकज संतोष महाजन यांच्या सौजन्याने आर. के. पटेल कारखाना, अमळनेर येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात १०० ते ११० कामगारांची सविस्तर आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन मा. विनोद भैय्यासाहेब पाटील आणि मा. बिपीन बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी, टी.बी., दमा, ईसीजी, रक्तातील साखर, एचबीएवनसी, न्युरोपथी, लिपिड प्रोफाइल, अॅसिडिटी स्कोअर यासह विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या.
या उपक्रमात मा. देवदत्त हरचंद संदानशिव, सचिव राय फाऊंडेशन, अमळनेर, मा. तुषार देवदत्त संदानशिव, अध्यक्ष राय फाऊंडेशन, मा. हेमंत बेहरे, कामगार अधिकारी, आर. के. कारखाना आणि मा. नारायण एकनाथ पाटील, युनियन नेते (आर. के. कारखाना) यांनी विशेष परिश्रम घेतले.
कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.