लाडक्या बहिणींना दिलासा : एप्रिलचे पैसे २-३ दिवसांत खात्यात जमा होणार. – आदिती तटकरे यांची माहिती.

24 प्राईम न्यूज 3 May 2025
एप्रिल महिना संपला तरीही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सन्मान निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक लाभार्थी बहिणींत नाराजी पसरली होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर निधी मिळेल, असे आश्वासन दिल्यानंतरही निधी न मिळाल्याने सरकारवर टीका सुरू झाली होती.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, येत्या २ ते ३ दिवसांत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी लाभार्थींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल.
‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडियावर माहिती देताना त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थींना शुक्रवारपासून त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थींना थेट निधी मिळेल.”