कामगार दिनानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल-मापाडी कामगारांचा गौरव. -आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू वाटप; समितीच्या कार्याची प्रशंसा..

0

आबिद शेख/अमळनेर




अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कामगार सन्मान सोहळ्यात कष्टकरी हमाल, मापाडी व श्रमिक कामगारांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कामगारांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.

या प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी बाजार समितीच्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेला हा कष्टकऱ्यांच्या सन्मानाचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.” याचबरोबर समितीच्या यशस्वी कार्यगौरवाबद्दल, समिती जिल्ह्यात प्रथम, विभागात तृतीय आणि राज्यात १७व्या क्रमांकावर आल्याबद्दल सभापती अशोक पाटील व संचालक मंडळाचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात सभापती अशोक पाटील यांनी सांगितले की, “बाजार समितीच्या यशामध्ये संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी यांच्यासह बाजार आवारातील हमाल मापाडी कामगारांचे मोलाचे योगदान आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले. आभार संचालक भोजमल पाटील यांनी मानले. या वेळी मंचावर संचालक समाधान धनगर, हिरालाल पाटील, पुष्पा पाटील, भाईदास भील, प्रकाश अमृतकार, ऋषभ पारेख, शरद पाटील, माजी जि.प. सदस्य ॲड. व्हि.आर. पाटील, अनिल शिसोदे, जळगाव जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमात बाजार समितीतील शेकडो हमाल, मापाडी तसेच अमळनेर नगर परिषदेतील श्रमिक कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!