विद्युत पुरवठा बंद – -आज अमळनेर शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित राहणार..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – ३३/११ केव्ही अमळनेर शहर उपकेंद्रातील ११ केव्ही ताडेपूरा वाहिनीवरील विद्युत पुरवठा देखभाल आणि दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामासाठी, रविवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
या कामामुळे ताडेपूरा फीडरवरील खालील भागांचा वीजपुरवठा खंडित राहील:
ड्रीम सिटी, रामनगर (१, २, ३), संत प्रसाद नगर, गुरुकृपा कॉलनी, सुरभी कॉलनी, मुंदडा नगर (१), गोहिल नगर, राजाराम नगर, रघुराजसिंह नगर, शहालम नगर, शिरूर नाका परिसर, बाळासाहेब ठाकरे चौक, वडचौक, माळीवाडा, रूबजी नगर, सावतावाडी, साडी वाडा, झामी चौक परिसर, मंगला देवी चौक, कसाली मोहल्ला, वाडी चौक, कुंभारटेक, सदर परिसर.
महावितरणने नागरिकांना याची नोंद घेण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. होणाऱ्या त्रासाबद्दल महावितरणने खेद व्यक्त केला आहे.
– महावितरण