मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्ति प्रदर्शन! शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश..

0

आबिद शेख/अमळनेर माजी मंत्री मा. गुलाबराव देवकर, सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे, प्रा. शरद पाटील, तिलोत्तमा पाटील, जाहिदा मोदी पठाण आणि यशवंत पाडवी अलिम मुजावर यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला बळ दिलं.

या वेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नवीन सहकाऱ्यांचं मनःपूर्वक स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला, तर काही महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शनही करण्यात आलं.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना नेत्यांनी सांगितलं की, “सत्तेचा उपयोग सत्तासुखासाठी नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी व्हायला हवा. घड्याळाच्या काट्यावर चालायचं असेल, तर विकासाचं भान ठेवावं लागेल.”

राज्य आणि केंद्रात विचारांची सत्ता आवश्यक असल्याचं सांगत, “विकासाचं इंजिन पुन्हा रुळावर आणण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत,” असं स्पष्ट करण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!