“धरणगाव येथे होणारा बालविवाह प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे थांबविण्यात आला.”

0


24 प्राईम न्यूज 5 May 2025

एक वेळेस आवश्य भेट द्या

धरणगाव (ता. धरणगाव) येथे चोपडा येथील 16 वर्षीय मुलगी आणि धरणगाव येथील 22 वर्षीय युवक यांचा विवाह दिनांक 5 मे 2025 रोजी निश्चित करण्यात आला होता. विवाहपूर्व हळदीचा कार्यक्रम 4 मे रोजी सायंकाळी पार पडणार होता.

मात्र, आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांनी मा. श्री. नितीनकुमार मुंडावरे (उपविभागीय अधिकारी, अमळनेर) यांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर, तात्काळ प्रशासनाने हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यासाठी कार्यवाही सुरू केली.

श्री. लक्ष्मण सातपुते (नायब तहसीलदार, धरणगाव), श्री. राहुल ढेरंगे (ग्राम महसूल अधिकारी), श्री. संतोष पवार (पोलीस उपनिरीक्षक), श्री. सुमित बाविस्कर (पोलीस कॉन्स्टेबल), तसेच श्री. उमेश पाटील (पोलीस नाईक) यांनी घटनास्थळी पोहोचून मुलीची आई, मुलाचे वडील आणि उपस्थित नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत समुपदेशन केले. तसेच संबंधित पालकांना लेखी समज देण्यात आली.

ही संपूर्ण कारवाई मा. उपविभागीय अधिकारी श्री. मनीष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री. महेंद्र सूर्यवंशी व पोलिस निरीक्षक श्री. पवन देसले यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक मोठा अनुचित प्रकार टळला असून बालकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठीचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!