महापालिका निवडणुकांना सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील!स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ४ महिन्यात घेण्याचे आदेश

24 प्राईम न्यूज 6 May 2025

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोर्टाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, सर्व राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढील चार महिन्यांत पार पाडाव्यात. यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांना आता मार्ग मोकळा झाला आहे.
कोर्टाने हेही स्पष्ट केले की, राज्य सरकार किंवा निवडणूक आयोग कोणत्याही कारणाने निवडणुका लांबवू शकत नाहीत. लोकशाहीच्या गाभ्यातील हा भाग असून वेळेवर निवडणुका घेणे अनिवार्य आहे, असेही कोर्टाने नमूद केले.