पिंपळे गावात लोसहभागातून नालाखोलीकरणाचे काम पूर्णपाण्याची चिंता मिटणार, सेवा सहयोग संस्थेचा मोलाचा सहभाग..

24 प्राईम न्यूज 7 May 2025

अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द आणि चिमणपुरी या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. धरती माता महिला शेतकरी गटाच्या पुढाकाराने सेवा सहयोग संस्थेला पोकलेन मशीनसाठी विनंती करण्यात आली होती. या विनंतीला प्रतिसाद देत संस्थेने लगेच मशीन उपलब्ध करून दिले.
माळन नदीच्या पात्रातील गाळ काढून नाल्याचे खोलीकरण सुरू झाले असून या कामात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. गावातील नागरिकांनी आपल्यापरीने देणगी देऊन सहकार्य केले. प्रशासकीय आयुक्त विजय चौधरी यांनी कामासाठी लागणारे डिझेल पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सरपंच वर्षा युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष निंबा बापू चौधरी, पाणी फाउंडेशनचे सुनील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याच आनंददायी प्रसंगी ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे काम शक्य झाले असून ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.