राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे संकेत!

24 प्राईम न्यूज 9 मे 2025

रवि ज्वेलर्स सराफ बाजार, अमळनेर 7074742121
– राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची शक्यता वर्तवली जात असून त्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. पुण्यातील मोदीबाग इथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना शरद पवारांनी महत्त्वाचे राजकीय भाष्य केले.

पत्ता : दगडी दरवाजाच्च्या आत, सराफ बाजार, अमळनेर
“सगळ्यांची विचारधारा एकच आहे, त्यामुळे दोन्ही गट एकत्र आले तर त्यात काही आश्चर्य नाही,” असं वक्तव्य करत त्यांनी संभाव्य एकत्रीकरणाची दारे उघडी ठेवली. पवारांनी स्पष्ट केलं की, याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी घ्यायचा आहे. “माझा निवडणुकीत सहभाग नाही, त्यामुळे मी या प्रक्रियेत नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
या पार्श्वभूमीवर, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही काही दिवसांपूर्वी वक्तव्य करत, “सुप्रिया सुळे यांना एकत्र येण्यावर सहमती असायला हवी,” असं म्हटलं होतं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी हात झटकत, “मी सामान्य कार्यकर्ता आहे, निर्णय साहेब आणि अजितदादा घेतील,” असं सांगितलं होतं.
या सगळ्या घडामोडींमध्ये रोहित पवार, अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. काही आमदार पुन्हा अजित पवार यांच्या गटात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.
राज्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचं या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.