कर्नल सोफिया कुरेशी यांचं घर देशभक्तीचं अद्वितीय प्रतीक

24 प्राईम न्यूज 9 May 2025

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील कोंनूर या शांत गावातील मोहम्मद गयास साब बागेवाडी यांचे घर आज देशभक्तीचे प्रतीक बनले आहे. त्यांच्या सुनबाई कर्नल सोफिया कुरेशी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या भारतीय सैन्याच्या विशेष मोहिमेत मोलाची भूमिका बजावली. हे ऑपरेशन काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवले गेले होते.

कर्नल सोफिया कुरेशी या गयास साब बागेवाडी यांचे चिरंजीव ताजुद्दीन बागेवाडी यांच्या पत्नी आहेत. त्या ‘आसियान प्लस मल्टिनॅशनल मिलिटरी’ मोहिमेत सहभागी झालेल्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. सध्या त्यांची नियुक्ती जम्मूमध्ये आहे, तर त्यांचे पती झाशी येथे सेवारत आहेत.
माध्यमांशी बोलताना गयास साब बागेवाडी यांनी भावना व्यक्त करत सांगितले, “मला काल दुपारी सोफियाविषयी अधिक माहिती मिळाली. जेव्हा मी टीव्हीवर तिची बातमी पाहिली, तेव्हा हृदय भरून आलं. आमचं संपूर्ण घर आज गौरवाने उजळून निघालं आहे.”