रोटरी क्लब अमळनेरचा ६९ वा चार्टर्ड डे साजरा – १८ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर | ९ मे २०२५ – रोटरी क्लब अमळनेरने आपल्या ६९ व्या चार्टर्ड डे निमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप केल्या. डिस्ट्रिक्ट ग्रँट अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण १८ विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने सायकली देण्यात आल्या.

कार्यक्रमाची सुरुवात केक कापून झाली. विशेष म्हणजे हा केक क्लबचे अध्यक्ष आणि उपस्थितांतील एका लहानग्याच्या हस्ते कापण्यात आला. या भावनिक क्षणाला क्लबचे ज्येष्ठ सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

निमित्त येणा-या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत…!
सायकल प्रकल्पात रो. ताहा बुकवाला, रो. सुहास राणे, रो. विजय माहेश्वरी, रो. अभिजीत भांडारकर, रो. विजय पाटील, रो. वृषभ पारख, रो. विनोद भैय्यासाहेब पाटील, रो. धीरज अग्रवाल आणि रो. परयांक पटेल यांनी आर्थिक मदत करून महत्त्वाची भूमिका बजावली.
कार्यक्रमात उपस्थितांना रोटरीच्या सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली. रोटरी हे केवळ एक क्लब नसून, समाजसेवेची बांधिलकी जपणारी चळवळ असल्याचे अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडून रोटरी क्लबचे मन:पूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास रो. रोहित सिंघवी, रो. देवेंद्र कोठारी, रो. आशिष चौधरी, रो. दिलीप भावसार सर, रो. प्रदीप पारख, रो. चेलाराम सेनानी, रो. महेश पाटील, रो. कीर्ती कुमार कोठारी, रो. डॉ. अनिल वाणी, रो. डॉ. राहुल मुठ्ठे, रो. पुनम कोचर, रो. राजेश जैन, रो. दिनेश रेजा आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. अभिजीत भांडारकर यांनी केले आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले.