राष्ट्रीय लोक अदालतीत ७२ प्रकरणांचा निकाल; -दोन कोटींहून अधिक रक्कम वसूल.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर (१० मे २०२५): जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, अमळनेर येथे आज राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली. या अदालतीत एकूण १४७९ प्रलंबित व ११०७ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४६ प्रलंबित व २६ वादपूर्व असे एकूण ७२ प्रकरणे निकाली निघाली असून, रु. २,०७,५६,६१४/- (दोन कोटी सात लाख छपन्न हजार सहाशे चौदा) इतकी रक्कम वसूल करण्यात आली.

या अदालतीत २ कौटुंबिक प्रकरणांत तडजोड साधली गेली असून संबंधित महिला नांदण्यासाठी परत गेल्या आहेत.

या लोक अदालतीत मा. प्रविण पी. देशपांडे (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), मा. निलेश आर. यलमाने (सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर), आणि मा. स्वाती एस. जोंधळे (२रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर) यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून अॅड. प्रशांत आर. संदानशिव, अॅड. शेखर ए. खैरनार, व अॅड. शुभांगी व्ही. निकम यांनी भूमिका बजावली.
या यशस्वी अदालतीसाठी अॅड. किरण अजबराव पाटील (वकील संघ अध्यक्ष), अॅड. के. व्ही. कुळकर्णी, अॅड. पी. ए. भट, अॅड. जी. वाय. विंचुरकर, अॅड. एम. जे. बागुल, अॅड. किशोर आर. बागुल, अॅड. विवेकानंद एन. चौधरी, अॅड. प्रणिता एन. गांधलीकर, अॅड. एम. एच. बडगुजर, अॅड. संदीप व्ही. बोरसे यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.