राणी लक्ष्मीबाई चौकात उघड्यावर गांजा पिणारा रंगेहाथ पकडले गुन्हा दाखल..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – अमळनेर शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकात उघड्यावर गांजा ओढणाऱ्या व्यक्तीस पोलीसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई ९ मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता करण्यात आली.

अमळनेर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली. गांजा ओढणाऱ्याचे नाव मनोज संभाजी सैंदाणे (वय ५३, रा. शिवाजीनगर, शिरूड नाका) असे आहे. पोलीस कर्मचारी मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, व नितीन कापडणे यांच्या पथकाने छापा टाकत त्यास अटक केली. त्याच्याकडून गांजा पिण्याचे साहित्यही जप्त करण्यात आले.
या प्रकरणी मनोज सैंदाणे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(सी) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.
