५ मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा; ‘ऑपरेशन सिंदूर’ची मोठी कामगिरी..

0

24 प्राईम न्यूज 11 May 2025


– पहलगाम हल्ल्यानंतर ७ मे २०२५ रोजी भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (LET) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या संघटनांशी संबंधित पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाने या दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत.

योजना कालावधी : दिनांक 6 जुन 2025 पर्यंत, आजच या दोन्ही ऑफरचा लाभ घ्या .. !

१. मुदस्सर खादियान खास उर्फ अबू जिंदाल
लष्कर-ए-तैयबाचा हा प्रमुख दहशतवादी मरकज तैयबा, मुरीदकेचा प्रमुख होता. त्याच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्करप्रमुख, मुख्यमंत्री मरियम नवाज आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तीन मजली भव्य नवीन शो-रूम

२. हाफिज मुहम्मद जमील
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि मौलाना मसूद अझहरचा मेहुणा. मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना निधी देण्यात त्याचा मोठा सहभाग होता.

३. मोहम्मद युसुफ अझहर
जैशचा प्रशिक्षक आणि आयसी-८१४ विमान अपहरण प्रकरणातील प्रमुख आरोपी. काश्मीरमधील अनेक हल्ल्यांचा सूत्रधार.

४. खालिद उर्फ अबू आकाशा
लष्करचा दहशतवादी, अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करणारा. जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये सहभागी.

५. मोहम्मद हसन खान
जैशचा दहशतवादी, पीओकेमधील ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा. हल्ल्यांचे समन्वयक म्हणून काम.

ही कारवाई भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाची मोठी यशोगाथा मानली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!