मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन – गरजूंसाठी सुवर्णसंधी..

आबिद शेख/अमळनेर


संत सखाराम महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त एक विशेष मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर विशेषतः गरीब, गरजू नागरिक व यात्रेकरूंना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात खालील आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत मुतखडा, मूत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशयाचे खडे स्वादुपिंडाचे आजार, लहान गाठी, मूळव्याध, हायड्रोसील, अंडाशयाचे विकार शस्त्रक्रिया: भगंदर, पित्ताशयाचे खडे, पायातील शिरा फुटणे, पोट व आतड्यांचे आजार कर्करोग, बालरोग शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्याचे विकारनाक, कान, घसा, नेत्ररोग, हृदयरोग, गर्भपिशवी विकार अस्थीरोग, मानसोपचार सेवा तसेच मोफत अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया याशिवाय, मोफत ईसीजी व कार्डिओग्राफही करण्यात येणार आहे.
महत्त्वाची सूचना:
रुग्णांनी येताना त्यांचे अस्सल आधारकार्ड आणि रेशन कार्ड सोबत आणणे अत्यावश्यक आहे.

निमित्त येणा-या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत…!
महेंद्र सुदाम महाजन